जळगाव राजमुद्रा दर्पण | संजय सावंत हे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख आहे त्यांच्या जिल्हयातील पाचही आमदार मंत्री शिंदे गटात सामील झाले मग पक्षनेते त्यांचा राजीनामा घेणार आहे का? असा सवाल बडखोरांमधील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी उपस्थित केला आहे. मनपा मध्ये शिवसेने सोबत जाऊन भाजप मधून बंडखोरी केलेले नवनाथ दारकुंडे ह्यांना त्या कारणामुळे चर्चेत असतात. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत हे आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देणार का? जळगाव मध्ये ते बॅनरबाजी करताय मग ते आजपर्यंत कुठे गेले होते? असा सवाल देखील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी उपस्थित केला आहे. एका खाजगी हॉटेल मध्ये बसुन ते पार्ट्या झोडतात तेव्हा त्यांना पक्ष दिसला नाही का? जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असलेले संजय सावंत यांनी आपल्या संपर्कप्रमुख पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री,आमदारांसह बंडखोरांनी केलेल्या गद्दारीची शिक्षा म्हणून पक्षनेते पदाचे राजीनामे घेण्यासंदर्भात दारकुंडे यांनी संपर्कप्रमुख सावंत यांना प्रश्न उपस्थित केला आहे. जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केली याकडे शिवसेना प्रमुख संपर्कप्रमुख नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार काय ? असा प्रश्न दारकुंडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्याभरात संपर्क प्रमुख यांच्या कामगिरीवर थेट आरोप करण्यात आल्याने शिवसेनेसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरसेवक दारकुंडे यांनी केलेल्या आरोपाचे व मागणीचे नेमके काय पडसाद उमटतात याकडे आता लक्ष लागून आहे.
सोशल मीडियावर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी या संदर्भातल्या काही पोस्ट देखील वायरल केले आहे राज्यभरात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असताना मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात शिवसेनेमधील नवा वाद चव्हाट्यावर आला आहे. थेट जळगाव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखावर गंभीर आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दारकुंडे यांनी केलेल्या मागणीची चर्चा जोरदार चर्चा रंगत आहे.
जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागासह शहरी भागाच्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये जिल्ह्यात झालेली बंडखोरी हा मुद्दा चर्चेचा बसणार आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतेच पक्षातून पळून गेले असे असताना कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश संपर्कप्रमुखांकडून मिळू शकतात. शिवसेनेत राज्यात घडत असलेल्या घडामोडीवर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.