शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 52 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली ,याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप सोबत युती केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली. आज आणि उद्या विधानसभा अध्यक्षाचा निवडणूक होणार होत्या म्हणून त्यांनी जवळ जवळ 12 ते 13 दिवसांनंतर बंडखोर आमदारांना गोव्याहून मुंबईत बोलावले , त्यांनतर सर्व बंडखोर आमदारांना भगवे फेटे बांधून एका बस मध्ये बसवले त्यांनतर ते थेट शिवसेना प्रमुख स्व.मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले. त्यांनतर हे सर्व आमदार विधानभवनात आले . याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा सर्व आमदारांना काही होऊ नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर ते सर्व विधानसभेच्या सभागृहात बसले पण बसताना ते त्यांच्या सत्ताधारी खुर्च्यांवर बसले आणि समोर शिवसेनेचे आमदार व विधानसभेच्या भवनाच्या प्रेक्षकांच्या गॅलरीतही काही शिवसेनेचे आमदार बसले होते तर या सर्व बंडखोर आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी ते आमदार बसले होते असा समज करून त्यावर जोरदार चर्चा रंगली होती.
आज विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत्या त्यात भाजपचे राहुल नार्वेकर यांनी 164 मते मिळवून बाजी मारली तर शिवसेनेचे राजन साळवी हे केवळ 107 मत पाडून पराभूत झाले. या निवडणुकीसाठी सर्व बंडखोर आमदार मुंबईत परतणार होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते , ‘त्यांनतर 15 बंडखोर आमदारांना जबरदस्ती डांबून ठेवला होता ते आमच्या संपर्कात आहेत’ असं देखील शिवसेने कडून सांगण्यात येत होते. त्यामुळे ते कोणाला मतदान करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
सर्व बंडखोर आमदार विधानसभेत पोहचल्या नंतर त्यांच्या प्रत्येक हालचालींवर शिवसेनेच्या आमदारांचे बारीक लक्ष लागून होते , विधानसभेच्या प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेले शिवसेनेचे विनायक राऊत , अनिल परब,अरविंद सावंत ,सचिन अहिर, त्याचसोबत अनिल देसाई आणि सचिव मिलिंद नार्वेकर बसले होते त्यांचे सभागृहात बसलेले बंडखोर आमदारांच्या हाचालींवर बारीक लक्ष्य होते ,विधानसभेच्या सभागृहात घडणाऱ्या सर्व गोष्टी त्याच सोबत या बंडखोर आमदारांना काय सूचना मिळतात ,त्यांच्या पैकी आपल्याकडे कोणी बघतय का? याकडे शिवसेनेचे लक्ष होत.