जळगाव राजमुद्रा दर्पण । गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात राजकीय तेढ निर्माण झाली आहे, शिकसेनेत सुद्धा 2 गट पडले आहेत ते म्हणजे एक उद्धव ठाकरे यांचा समर्थनातील गट आणि दुसरा म्हणजे स्वतंत्र शिंदे गट. जळगाव महानगरपालिकेत सुद्धा आता शिवसेनेचा स्वतंत्र गट असणार आहेत . नगरसेवक ललित कोल्हे एका वृत्तपत्राशी संवाद साधताना म्हणाले कि , ” आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे नगरसेवक आहेत ,तब्बल 21 नगरसेवकांचा आम्हला पाठिंबा आहे ,यात कोणतेही सत्तांतर होणार नाही ,सध्याचा शिवसेना गट सुद्धा आमच्या सोबत राहणार, कारण त्यांचे आणि आमचे विचार एक आहेत. ”
राज्यात सुरु असलेला राजकीय संघर्षात शिवसेना फुटली आणि यात 2 गट पडले ,एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 ते 50 आमदारांनी स्वतंत्र शिवसेना गट स्थापन केला. याच पार्श्वभूमीवर या स्वतंत्र गटाचे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुखमंत्री झाले . जळगाव महानगरपालिकेतील भाजपाचे फुटलेले नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुलाची भेट घेऊन शिंदे गटाला समर्थन केले होते. त्यातच या स्वतंत्र गटाला समर्थन देणारे नगरसेवक ललित कोल्हे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दर्शवले.
ललित कोल्हे पुढे म्हणाले की “आम्ही नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दर्शवले आहे आणि आता पुढे गुलाबराव पाटील यांचीही भेट घेणार आहोत, आम्ही स्वतंत्र शिवसेना गटाला पाठिंबा देत आहोत आणि महानगरपालिकेत शिवसेना म्हणून आमचा गट सुद्धा स्वतंत्र असणार आहे, आमच्या सोबत 21 नगरसेवक आहेत, आणि सध्या असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत च आम्ही असणार आहोत व तेही आमच्या सोबतीला असतील मात्र जळगाव शहराच्या विकासाच्या मार्गाने आम्ही सोबत महापालिकेत कार्य करणार आहे.”