जळगाव राजमुद्रा वृतसेवा | प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ , असे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादी तर्फे प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असे मलिक यांनी माहिती देताना सांगितले आहे.
देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल असे देखील मलिक यांच्याकडून सांगण्यात आले आहे.