(राजमुद्रा वृत्तसेवा) शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी निधीची मागणी करण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली होती. आमदार शिरीष चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जयंत पाटील यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नुकतेच त्यांचे पत्र मिळाळे असून त्यात शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या वार्षिक आखणी मध्ये १४० कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे. सदर निधीमुळे शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पाचे काम पूर्णत्वास होण्यास मदत होवून, पुढील वर्षापासून पासून बँरेज मध्ये पाणी साठवता येवून हजारो हेक्टर जमीन ओलीता खाली येईल असे आमदार कार्यालयाने कळविले आहे. या निधीबद्दल आ.चौधरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.