मुंबई राजमुद्रा दर्पण – एकनाथ शिंदे व अनेक नेत्यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी दरार पडली आहे. अनेक मोठमोठ्या नेत्यांनी शिवसेनची साथ सोडल्यामुळे ठाकरे पितापुत्रांनी पक्षाला पुनर्जीवित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठकींचा आणि दौऱ्यांचे आयोजन केले आहे. आदित्य ठाकरे सर्वसामांन्य कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात भेटीगाठी घेतायेत. त्याचसोबत बंडखोर आमदारांच्या मतदारसंघा मध्ये शिवसंवाद रॅलीच्या माध्यमातून जनतेला संबोधित करत आहेत. आतापर्यंत आदित्य यांच्या दौऱ्यांचे 2 टप्पे पूर्ण झाले आहेत.
यादरम्यात आता आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद दौरा तिसऱ्या टप्प्यात आला आहे. येत्या 9 ऑगस्टपासून सुरू होणारा या दौऱ्यात आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत, अशी चर्चा सुरू झालीय. हा 2 दिवसीय दौरा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात असणार आहे. आदित्य ठाकरे यावेळी बंडखोरी केलेल्या माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातही हा दौरा घेऊन जाणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात येत्या 9 आणि 10 ऑगस्टला जळगाव, पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक, सिन्नर आणि भिवंडी ग्रामीण भागामध्ये शिव संवाद दौरा काढणार आहेत.
शिवसंवाद दौरचे वेळापत्रक
पहिल्या दिवशी 9 ऑगस्ट 2022
सकाळी 11.30 वाजता – पाचोराऱ्यात शिव संवाद दौरा
दुपारी 1.45 वाजता – धरणगाव (जळगाव ग्रामीणभागात) शिव संवाद दौरा
दुपारी 03.00 वाजता – पारोळा (एरंडोल) येथे शिव संवाद दौरा
संध्याकाळी 04.30 वाजता – धुळ्यात स्वागत व बैठक
संध्याकाळी 06.00 वाजता – मालेगाव येथे शिव संवाद दौरा
दुसरा दिवस 10 ऑगस्ट
दुपारी 12.30 वाजता – सिन्नर येथे शिव संवाद
संध्याकाळी 4.15 वाजता – आंबाडी (भिवंडी ग्रामीणभागात) येथे संवाद