(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राष्ट्रीय तथा महाराष्ट्र राज्य आय. एम. ए. द्वारे १८ जून रोजी देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती आय. एम. ई. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी आणि डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी दिली.
‘हा दिवस देशभरातील डॉक्टर राष्ट्रीय निषेध दिन म्हणून पाळणार आहेत. हे आंदोलन कोविडच्या सर्व प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनाची भूमिका जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. कोविड १९ ची दुसरी जागतिक साथ साधारण मार्च २०२० च्या आसपास भारतात सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत जगात १७.५ कोटी, भारतात २.९५ कोटी, महाराष्ट्रात ५९.०८ लाख लोक या विषाणूमुळे बाधित झाले आहेत. तीन लाखाच्या आसपास लोकांनी यात आपले प्राण गमावले आहेत. हा मृत्यू दर कमी राखण्यात आय. एम. ए. सदस्यांसह देशातल्या आरोग्य यंत्रणेचा फार मोठा वाटा आहे.’ असेही त्यांनी सांगितले.
कोट्यावधी देशवासीयांचे प्राण वाचवताना ७०० पेक्षा जास्त संघटनेच्या डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले असून कारगिल युद्धातील शहीदांच्या संख्येपेक्षा अधिक हा आकडा अधिक आहे. योग ट्रेनर यांनी डॉक्टरांबद्दल अपमानजनक व खालच्या स्तरावर टिपणे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ऍलोपॅथी या शास्त्राबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य याचा आम्ही निषेध करीत आहोत तसेच सर्व वैद्यकीय क्षेत्राच्या योगदानाचा त्यांनी अपमान केला आहे.
या आहेत देशव्यापी आंदोलनात डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या
- डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा
- कायद्याचा मसुदा संसदेत सादर करण्यात यावा
- गृहमंत्रालयाच्या काही आक्षेपांमुळे हा कायदा पारित होण्यापासून थांबलेला आहे तो त्वरित पारित करण्यात यावा
- सर्व वैद्यकीय आस्थापनास संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात यावे
- रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे यासह इतर मागण्यांच्या समावेश आहे.
याप्रसंगी आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. सी जी चौधरी एस.बी.आय. चे राज्य सचिव डॉ. अनिल पाटील, डॉ स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. दिलीप महाजन आदी उपस्थित होते