(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खडसे यांनी उपस्थित मंत्री महोदय यांचे स्वागत केले. पक्षसंघटन आणि विविध विषयांवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जळगाव जामोद बाजार समितीचे माजी सभापती प्रसेनजित पाटील, जळगाव जि प चे माजी गटनेते विनोद तराळ, संदीप देशमुख, विजय सोनार, गणेश तराळ आदी उपस्थित होते