राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – आज तालुक्यातील नांद्रा बु ll येथे गावातील पूर्व स्वातंत्र्य सेनानिंच्या प्रेरणेने तसेच आझादी का अमृत महोत्सव – स्वतंत्रता सप्ताहाचे औचित्य साधून गावातील जि. प. मराठी शाळा येथे जळगाव जिल्हा शेतकरी तक्रार निवारण समिती सदस्य व भारतीय सनदी लेखाकार संस्थेचे कोषाध्यक्ष सीए. हितेश किशोर आगीवाल यांच्या संकल्पनेतून तसेच वाचनालय कट्टा तरुण मंडळी व जे.सी.आय. जळगाव सेंट्रल यांच्या सहकार्याने युवकांच्या महाश्रमदानातून वृक्षरोपन अभियान राबविण्यात आला. त्यात वाचनालय कट्याच्या सगळ्या तरुण सदस्यांनी व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि सर्वांनी आपला पर्यावरणाचे संगोपन करण्याची एकमुखी प्रतिज्ञा घेतली.
यावेळेस सर्व तरुणांनी गावात पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी सदैव कटिबध्द राहू तसेच ग्रामस्थांना वृक्षरोपण व संगोपनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिज्ञा घेऊन संपूर्ण शाळेचे प्रांगण व सभोवतालचा परिसरात विविध वृक्षांची लागवड केली.
या प्रसंगी गावातील जुन्या ११ स्व. स्वातंत्र्य सेनानी तसेच स्व. उमेश (भटू) पाटील यांचे नाव प्रत्येक रोपट्यास देऊन आगळी वेगळी आदरांजली वाहून होणाऱ्या वृक्षवाढी सोबत समस्थ स्वातंत्र्य सैनिकांचे विचार सुद्धा नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन आगीवाल यांच्या मार्फत करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित केंद्र प्रमुख संजय भालेराव, उपशिक्षक राजेंद्र चव्हाण व सुधाकर पाटील यांनी उपस्थित तरुण व माजी विद्यार्थ्यांना पाठीवर शाबासकीची थाप देत आभार मानले.
तसेच अशा प्रकारे श्रमदानातून समाज उपयोगी कामे यापुढेही करण्यात यावी व जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी त्यात सहभागी होऊन आपल्या गावाला जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा नक्कीच निर्मळ प्रयत्न करण्याचा एक चांगला पायंडा पडावा व खऱ्या अर्थाने संपूर्ण राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा असे मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी सीए. हितेश आगीवाल, जे.सी.आय. जळगाव सेंट्रलचे ऋषभ शहा, श्रेणिक जैन, वाचनालय कट्ट्याचे संदीप साळुंखे, राकेश चौधरी, निखिल चव्हाण, निखिल पाटील, हेमंत सोनवणे, निखिल पाटील, भरत पाटील, कुणाल पाटील, राहुल सोनवणे, प्रवीण सोनवणे, ललित निकम, ललित वाघ, दिपेश चौधरी, चेतन पाटील, योगेश चौधरी, जयेश पाटील , नरेंद्र वाघ यांनी श्रमदान केले.