जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – जळगाव जिल्हा दूध संघात राष्ट्रीय कृषी विकास या योजनेअंतर्गत दुग्धजन्य पदार्थ प्लंटचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण त्याचसोबत मुख्य दुग्धशाळेचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण या प्रकल्पांमध्ये आर्थिक अनियमिततेबाबत राज्याचे उपसचिव नि.भा.मराठे यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी दुग्ध संस्था नाशिक यांना जळगांव जिल्हा दूध संघामधील संचालकांवर १५ दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत वरील दोन मोठे मोठे प्रकल्पांसाठी प्रत्येकी ₹ २४.७० कोटी असे एकूण ४९.४० कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना संघाने DPR नुसार असलेल्या घटकांप्रमाने दिलेला खर्च न करता अतिरिक्त खर्चाचा समावेश केला असे दिसून आले , त्यामुळे मराठे यांनी संचालकांवर अधिनियम १९६० व २०१३ यामधील तरतुदीनुसार संचालक मंडळाविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना जारी केल्या आहे.
शासनाच्या पत्रान्वये आयुक्त ने दि.१ ऑगस्ट रोजी , दुग्धव्यवसाय विकास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने एक अहवाल सादर केला होता, या अहवालानुसार DPR मध्ये मंजूर झालेल्या कामांवर खर्च झालेल्या बचतीचा वापर अतिरिक्त घटकांवर करण्यात आला आहे.हा खर्च करत असताना प्रकल्पाला मंजूर झालेल्या किंमतीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. त्यानुसार मुख्य दुग्धशाळेचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणात ५.९२ कोटी आणि उत्पादित दुग्धजन्य पदार्थ प्लॅन्टचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणात ३.९९ कोटी अधिकचा खर्च केला आहे,असे प्रथमदर्शी दिसून आले आहेत.
अतिरिक्त खर्च झालेले ७.२६ कोटी रुपये शासनाला परत करणे आवश्यक आहे :-
राष्ट्रीय कृषी विकास योजन अंतर्गत जळगाव दूध संघात दुग्धजन्य पदार्थ प्लांट चे आधुनिकीकरण व विस्तारीकरण आणि मुख्य दुग्धशालेचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण याप्रकल्पांसाठी लागणाऱ्या व मंजूर झालेल्या खर्चा व्यतिरिक्त ७.२५ कोटी रुपये इतका अनावश्यक खर्च झाला आहे. त्यामुळे शासनाला हे अतिरिक्त खर्च झालेले ७.२५ कोटी रुपये परत करणे आवश्यक आहे ,असे असताना संघाने सदर रक्कम शासनाला अजूनही परत केली नाही , शासनाने आर्थिक अनियमितता लक्षात घेऊन संचालक मंडळविरुद्ध कारवाई चे आदेश जारी केले आहे, पुढील १५ दिवसात केलेल्या कारवाईचे अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्याचे उप सचिव नि.भा मराठे यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी दूध संस्था नाशिक यांनी केल्या आहे .