जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – आज जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात धक्कादायक घटना घडली , या परिसरात 2 तरुणांमध्ये वाद झाला , त्यात एकाची हत्त्या करण्यात आली आहे. हा वाद मोबाईल वरून सुरू होता असे मिळालेल्या माहितीतून सांगण्यात येत आहे. हा वाद 2 तरुणांमध्ये सुरू होता दरम्यात या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले व शेवट हा खूनाने झाला.
ही घटना आज म्हणजे 21 ऑगस्ट ,रविवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्तोपसमोरील असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानाजवळ घडली ,यात मयत अक्षय चव्हाण यांचा बळी गेला, अक्षय च्या शरीरावर धारधार शस्त्राने वार केले दरम्यात ,अक्षय ला दवाखान्यात नेले असता डॉ्टरांनी त्याला मृत घोषित केले ,याप्रकरणातील पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहे.