राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने फोन करून पैसे मागितले आहेत. युवा सेनेच्या एका कार्यकर्त्याने या पैशांची मागणी केली होती. एका अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आता त्याचा तपास सुरू केला आहे. फोन करणाऱ्याने 25 हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
मला फोन आल्यावर आश्चर्य वाटले :-
दादरमधील एका रहिवाशाच्या म्हणण्यानुसार, त्याला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला होता. व्हॉट्सअप डीपीमध्ये आदित्य ठाकरे यांचा फोटो जोडण्यात आला होता. हे पाहून त्या माणसालाही आश्चर्य वाटले. यानंतर फोन करणाऱ्याने 25 हजार रुपये मागितले. त्याला त्याच्या एका मित्राला मदत करायची असून दुसऱ्या दिवशी पैसे परत करणार असल्याचे त्याने सांगितले. हे ऐकून फोन रिसीव्हरला हा फेक कॉल असल्याचे समजले.
शिवसेना कार्यालयात दिली माहिती :-
यानंतर या व्यक्तीने स्थानिक शिवसेना कार्यालयातही याबाबत माहिती दिली. याप्रकरणी शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. अधिकाऱ्याने सांगितले की, हा फोन नंबर उत्तर प्रदेशातील असू शकतो, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.