जळगाव राजमुद्रा : राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी, संघटन वाढीसाठी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खडसे यांनी केले मात्र खडसे यांच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीतील नेत्यांची साथ आहे का ? हा एक सवालच आहे. राष्ट्रवादी विस्तारासाठी जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष व्हावा ही खडसेंची तळमळ वरिष्ठ नेत्यांना देखील ज्ञात आहे. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला विजयश्री मिळवायचा असेल तर अनेक संवादातून खडसे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना दिसून येत आहे.
गटातटात विभागल्या गेलेल्या राष्ट्रवादीला खडसे यांचे नेतृत्व आधार देऊ शकते हे सर्वश्रुत आहे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खडसेंच्या मागे वरिष्ठ नेते मोठ्या ताकतीने उभे राहतील हे निश्चित आहे. मात्र खडसेंनी ठरवल्यास संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी ताकतवर होऊ शकते हे देखील काळ्या दगडावरची रेष आहे.
भाजपा मध्ये असताना नाथा भाऊंनी अनेक संघर्षातून वाटचाल केली यामुळे ते राज्याचे नेते होऊ शकले प्रारंभी भाजपमध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात त्यांनी पकड राज्यभरात केली यामुळे त्यांचे चाहते राज्यभरात आहे. नाथाभाऊ.. शब्दाचा पक्का माणूस.. ही ख्याती खडसेंची आहे. भाजप सत्तेत यावा यासाठी प्रयत्नांचे परागाष्टा खडसेंकडून झाली मात्र अंतर्गत राजकारणाचा फटका खडसेंच्या राजकीय करिअरला बसला, जीवनात कितीही संघर्ष करावा लागला तरी सामोरे जायचे हा दृढ विश्वास (व्हील पॉवर) खडसेंकडे आई मुक्ताईने ठासून दिला आहे. त्याच बळावर ईडी,आयकर, भोसरी अशा विविध प्रकरणात सहभागाचे आरोप झाल्यावर देखील नाथाभाऊंचा जनाधार कायम राहिला.
पुढील राजकारण नाथाभाऊं साठी पाहिजे इतके सोपे नाही,राज्यपाल नियुक्ती आमदारकीत वर्णी न लागल्याने खडसेंना राष्ट्रवादीत जाऊन देखील सभागृहात जाण्यासाठी वर्षभर थांबावे लागले, मात्र राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने चंग बांधला म्हटल्यांवर खडसेंना अखेर विधानपरिषदे वर घेण्यात आले. खडसेंना थांबवण्यासाठी भाजप कडून निवडणूक प्रतिष्ठेची बनविण्यात आली. मात्र खडसेंच्या नशिबात आमदारकी होतीच, सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने पुन्हा एकदा भोसरी प्रकरण काढले आहे. यामध्ये खडसेंच्या भोवती चौकशी फेरा सुरू केला, यामुळे विधानपरिषदेच्या सभागृहात खडसेंचा आवाज गर्जताना कायदेशीर चाऱ्या मारल्या गेल्या आहे. किती खनायचे ते खणत रहा… असे विधान खडसेंनी केले उत्तराला प्रत्युत्तर देण्याचा सभाव खडसेंचा आहे. त्यामुळे ते बोललेच मात्र आगामी राजकारणात खूप काही बदलले आहे. राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात वाढवण्यासाठी वरिष्ठांनी खडसेंकडेच नेतृत्व दिले आहे. आगामी काळात निवडणुका तोंडावर आहेत, खडसेंनी ठरवल्यास ते विजश्री खेचून आणू शकतात. हाच आत्मविश्वास नाथाभाऊंच्या नेतृत्वावाला सिद्ध करतो.