राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – काही लोक कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आहेत. तर त्याला काहींचा सपोर्ट आहे नरेंद्र जोशी ह्या प्रकल्पाला कडाडून विरोध करीत आहे. रिफायनरी प्रकल्पाचे विरोधक नरेंद्र जोशी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना धमकी दिली आहे. नरेंद्र जोशी यांनी उदय सामंत यांना धमकी दिली असून, “रिफायनरी प्रकल्प झाला तर आम्ही उदय सामंत यांना जाळून टाकू,” अशी धमकी त्यांनी दिली आहे. याप्रकरणी उदय सामंत तक्रार करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.