आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकासमंत्री गिरीषमहाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीदेखील विशेष उपस्थिती
आमदार मंगेश चव्हाण स्वागताध्यक्ष, अधिवेशनात मांडले जाणार आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांचे विविध ठराव – एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष
चाळीसगाव राजमुद्रा – आदिवासी जननायक तंट्या तात्या भिल्ल यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि.२ ऑक्टोंबर रोजी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे महाअधिवेशन चाळीसगाव येथे छत्रपती महाराज चौक येथील मैदानात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आले असून सदर महाअधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकासमंत्री गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची देखील उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश असणार आहेत. यावेळी आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत १९ ठराव मांडले जाणार असून राज्यभरातून २५ हजार आदिवासी भिल्ल समाज बांधव या महाअधिवेशनाला उपस्थित राहतील अशी माहिती एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी दिली आहे.