जळगाव राजमुद्रा | गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांच्या भेसळ युक्त तेलाबाबत तक्रारी असताना आता मात्र सणासुदीच्या दिवाळीच्या दिवसांमध्ये भेसळयुक्त तेल बाजारात विक्रीला आल्याच्या धक्कादायक तक्रारी नागरिकांकडून होत आहे. दिवाळीच्या सणासुदीमध्ये तेलाची मोठ्या प्रमाणात मागणी असते असे असताना तेल माफिया मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त तेल बाजारात विक्रीसाठी आणत असल्याचा धक्कादायक जळगावात चर्चिला जात आहे. मात्र या सर्व विषयाकडे अन्न औषध प्रशासनाने सोईस्करपणे कानाडोळा केलेला आहे. अद्याप पर्यंत एकही कारवाई अन्न औषध प्रशासनाकडून झाली नसल्याने संशयाची तार थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत जोडली जात आहे.
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात केला पासून अनेक पदार्थ बनवले जातात यामध्ये खास करून दिवाळीचा चिवडा, शेव, बर्फी अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो, भेसळयुक्त तेलामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे यापूर्वीच कोरोना काळात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. असे असताना अन्न व औषध प्रशासना कडून भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांचा अद्याप पर्यंत बंदोबस्त करण्यात आलेला नाही.
सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ बाजारात विक्रीला आल्या असताना नागरिकांनी सण साजरा करायचा की अन्न औषध प्रशासन विभागाकडे तक्रारी करायच्या असा थेट सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. याबाबत योग्य ती शहानिशा करणे अन्न औषध प्रशासनाची जबाबदारी असताना मात्र दिवाळीच्या उत्सवात निगरगट्ट अधिकाऱ्यांनी झोपेचे घेतल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहराकडे दिवाळीच्या सणा च्या काळात खरेदीसाठी येत असतात मात्र डोळ्याला पट्टी लावून बिनधास्तपणे भेसळयुक्त पदार्थ यामध्ये सर्वाधिक तेल विक्री केल्या जात असल्याचा धक्कादायक तक्रारी नागरिकांच्या येत आहे. शहरात आल्यावर दोन पैसे वाचवण्याच्या नादात अनेक जणांची भेसळयुक्त पदार्थ विक्री करून फसवणूक होत असल्याची बोंबाबोंब बाजार परिसरात सध्या आहे.
अनेक नागरिकांनी तर खरेदी करण्यात आलेल्या तेलापासून घरात दिव्यांमध्ये तेल वापरले असता चक्क दिवे तेल असताना पेट घेत नसल्याने अनेकांना मनस्ताप झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामधील काही लोकांनी थेट दुकानदारापर्यंत तक्रारी केल्या असता, दुकानदारांनी “आमच्याकडून खूप लोक तेल खरेदी करत असताना तुमच्याच तेलात काय नेमका गोळ आहे, असा या उलट आरोप दुकानदाराकडूनच करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे.