जळगाव राजमुद्रा | जिल्ह्यातील राजकारणाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. कारण देखील तसेच आहे, एकीकडे भाजपमध्ये असताना एकाच व्यासपीठावरून पक्षाची राजकीय धोरणे निर्णय देणाऱ्या नेते एकमेका विरोधात उभे टाकले गेले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय रणसंग्राम दिवाळीच्या सणात पाहायला मिळत आहे. खडसे महाजन हा वाद आता काही नवीन राहिलेला नाही मात्र वात जरी जुना असला तरी नवीन नवीन नाट्यमय कायदेशीर घडामोडी या दोन्ही गटात घडताना दिसत आहे. एवढेच नाही दोन्ही गटाकडून राजकीय विरोधच नव्हे तर व्यक्तिगत लढाईचे रणसिंग फुंकले गेले आहे.
गेल्या अनेक दिवसात पासून भोसरी जमीन घोटाळ्या बाबत तत्कालीन भाजप सरकार मधूनच क्लीन चिट मिळालेली असताना आता पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भोवती चौकशीचा फास भोसरी जमीन घोटाळ्याच्या माध्यमातून उभा करण्यात आला आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यातच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विविध लढाईंना सामोरे जावे लागले आहे दूध संघात झालेली प्रशिक्षकांचा प्रवेश त्यांनी बेकायदेशीर ठरवला तर भोसरी जमीन घोटाळ्या बाबत होत असलेली पुनर चौकशी ती देखील न्यायालयात जाऊन अवैध ठरवली, याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. भोसरी प्रकरण प्रकरणी न्यायालयाने सरकारी एजन्सीयांवर ताशेरे देखील ओढले आहे. याबाबत पुन्हा एकदा खडसेंना राजकीय लढाई सोबत कायदेशीर लढाई करावी लागत आहे.
यामागे नेमकं कोण ? अद्याप पर्यंत झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीरपणे कॅमेरासमोर खडसे बोललेले नाहीत मात्र खडसेंचे पक्के राजकीय विरोधक कोण ? हे सर्वश्रुत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू केल्याची दबत्या आवाजात चर्चा आहे. खडसे भाजपमध्ये असताना अनेक चौकशां सुरू होत्याच पण भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा पासून खडसेंना भोसरी प्रकरण अधिक भोवले, ईडीने त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना गेल्या दीड वर्षापासून अटक देखील केलेली आहे. अद्याप पर्यंत त्यांचा जामीन होऊ शकले नाही.
मात्र यासाठी खडसेंचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जात, या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची कुठलीही भेट प्रत्यक्षात होऊ शकले नाही मात्र लवकरच देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्याशी माझी भेट होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझ्याविरुद्ध कशा पद्धतीने षडयंत्र रचलं जात आहे. असे अनेक खळबळजनक आरोप माध्यमांसमोर खडसे मांडताना दिसून येत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपल्या विरोधकांना जागा दाखवण्याचा चंग बांधल्याचे बोलले जात आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळात झालेल्या मानसिक छळाबाबत महाजन यांनी देखील महाविकास आघाडीची सत्ता असताना अनेक दावे केले इथवरच नाही तर त्यांच्या कनिष्ठ मुलीचा विवाहाच्या पाच दिवसापूर्वीच मोक्का लावणार याबाबतची त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेली चर्चा राज्यभरात पसरली होती.
मात्र पेन ड्राईव्ह बॉम्ब फुटला आणि या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले, यामध्ये थेट धुळे येथील माजी आमदार अनिल गोटे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विशेष सरकारी वकील प्रवीण सूर्यवंशी विधीतज्ञ विजय पाटील यांच्यासह अनेकांची नावे पुढे आले सरकार याबाबत सध्या सीबीआय चौकशी करीत आहे. यामुळे राजकीय गणितात तरबेज असणारे महाजन त्या काळात थोडक्यात बचावले असे त्यांचे विरोधक जाहीरपणे सांगताना दिसून येतात.
माजी मंत्री एकनाथराव खडसे व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कोणतीही संधी एकमेकास देऊ इच्छित नाही जिल्हा बँकेत झालेले उमेदवारांचे अवैद्य अर्ज महाजनांच्या चांगल्या जिव्हारी लागले त्यामुळे महाजनांनी आगामी निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. यासाठी विविध माध्यमे वापरली जात आहे. अनेक घोटाळे या निमित्ताने दूध संघातून समोर येत आहे. एकमेकांना आव्हान देण्याच्या पेज प्रसंगात नेमकी कोणते फटाके दिवाळीच्या सन उत्सवात खडसे महाजन फोडू पाहत आहे. हे आगामी काळात समजेल..