पुणे राजमुद्रा | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार घडामोडींना अखेर वेगाने आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगवेगळ्या आणि जलद गतीने घडामोडी घडत आहे. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये असलेले नाराजी राज्यात सत्तांतर होऊन चार महिने उलटल्यावर देखील अद्याप पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार दुसऱ्या टप्प्यातील झालेला नाही, अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा असताना मात्र विस्तारासंबंधी कोणत्याही हालचाली सरकारकडून करण्यात आलेले नाही, यासोबतच आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यामधील वाद टोकाला पोहोचले असताना त्यांच्यामध्ये थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागत आहे. यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ताधारी पक्षात सुरू असलेल्या वादाचा फायदा घेण्याला सुरुवात केली आहे.
पुणे येथे राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बूथप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगामी महापालिका नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला प्रचंड यश खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन खा सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात मंत्रीपदावरून रस्त्याचे सुरू आहे. यामुळे अनेकांची नाराजी यामध्ये दिसून येते मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचवून कामाला लागण्याचे सूचना सुप्रिया सुळे यांनी दिल्या आहेत.
पक्ष संघटन व बांधणीच्या कामाला अधिक महत्त्व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात येत आहे बूथ प्रमुखापासून ते थेट विभाग प्रमुखापर्यंत आढावा पक्षातील नेते घेत आहे यासाठी खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील कंबर कसली आहे. सत्तेच्या बाहेर असल्याने अधिक संघर्ष आपल्याला करावा लागणार असून यासाठी आपल्या भागातील लोकांपर्यंत आपला जनसंपर्क कायम ठेवून त्यांच्या समस्यांना प्राधान्य द्यावे समस्या जर मोठे असतील तर थेट पक्ष नेतृत्वापर्यंत त्या मांडावे अशा देखील सूचना खा. सुप्रिया सुळे यांनी दिले आहे