मुंबई राजमुद्रा | राज्यामध्ये शिवसेनेच्या फुटी वरून अनेक वाचन रंगात असताना एकमेकांच्या कुरवड्या करण्यात नेते व्यस्त असल्याचे दिसून येत आहे अनेक वेळा पातळी ओलांडून एकमेकांवर थेट आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहे असे असताना मात्र राज्याचे राजकारण या सर्व आरोप प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा दारू बाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती याबाबत पलटवार म्हणून शिंदे गटाचे किरण पावसकर यांनी तुमचा देखील दारू पार्टीचा व्हिडिओ समोर असा गोप्या स्पट केला आहे.
ज्यांना नाईटलाइफ चा आकर्षण आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक बंद करावं, आदित्य ठाकरे यांची मीटिंग सुरू असताना दारूचे व्हिडिओ आहे. त्यांच्या पार्टीचे व्हिडिओ आहेत, तुम्हाला किती व्हिडिओ बघायचे आहेत,
अशा शब्दात शिंदे गटाचे किरण पावस्कर यांनी टिका केली आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणी दौऱ्यासाठी बीड येथे गेले असता, रेस्ट हाऊस मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा पीत होते, यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले, त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का ? असं मिश्किल शब्दात विचारले. सत्तारांचा हाच व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केला, त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. मात्र याला पलटवार म्हणून आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.