जळगाव राजमुद्रा – राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगर च्या वतीने आकाशवाणी चौक , जळगाव येथे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधात “उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला” हे आंदोलन करण्यात आले . वेदांता फॉक्सकॉन , टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात स्थलांतरित झाल्या बद्दल तसेच युवकांच्या पोलिस भरतिवर स्थगिती आणल्या बद्दल व युवकांना रोजगाराचे खोट्या आश्वासनांचे गाजर दिल्याबद्दल सदरचे आंदोलन करण्यात आले .
आंदोलनांत मोदी, शहा , शिंदे, फडवणीस, उदय सामंत यांचे फोटो असणारी कागदी विमाने हवेत उडवून शिंदे-फडणीस सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला . आंदोलनात कार्यकर्त्यांनी “महाराष्ट्राचे गद्दार..गुजरातचे वफादर..! “, ” महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा निषेध..! ” , ” गुजरात तुपाशी..महाराष्ट्र उपाशी…!” , ” द्या आमच्या रोजगाराची हमी.. बंद करा गुजरातची गुलामी..!” , “फडवणीस खातात महाराष्ट्राची भाकरी…करतात गुजरातची गुलामी..!” , ” शिंदे फडवणीस यांच्या फेकू गप्पा… महाराष्ट्रद्रोही भाजपा..! महाराष्ट्र द्रोही भाजपा.! ” , ” गद्दारांना 50 खोके.. महाराष्ट्राला धोके ” या घोषणा देऊन सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला .
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर अध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक महानगर अध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . या आंदोलना वेळी वाल्मीक पाटील, अमोल कोल्हे , किरण राजपूत , भगवान सोनवणे, ईब्राहिम तडवी, सुशील शिंदे, साहिल पटेल, रफिक पटेल, चेतन पवार, योगेश साळी, नरेंद्र शिंदे, रहीम तडवी, खलील शेख, हितेश जावळे, शैलेश अभंगे, योगेश कदम, सचिन साळुंखे, विनोद धुमाळ, आकाश हिरवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .