राजमुद्रा | एखाद्यावर संताप व्यक्त करण्यासाठी आपलेच लोक कोणते पातळीवर होणारे हे सांगता येत नाही याच पद्धतीने केरळच्या तिरुअनंतपूरमध्ये एका गर्लफ्रेंडने तिच्या प्रियकराला ज्यूस मध्ये विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अति विश्वासू पणामुळे त्या बॉयफ्रेंडला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत तरूणाचं नाव शेरॉन राज असं असून त्याचा 25 ऑक्टोंबरला मृत्यू झाला होता. पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालं आहे की शेरॉन राजला त्याच्याच गर्लफ्रेंडने मारल्याचा संशय शेरॉन च्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता मात्र शेरॉन राजला का मारलं यामागचं कारण अद्याप समोर आलं याबाबत पोलीस तपास करीत आहे.
केव्हा झाली शेरॉन वर विष प्रयोग ?
मृत शेरॉन राजची गर्लफ्रेंड शेरॉनला 14 ऑक्टोबरला त्याच्या घरी घेऊन गेली होती. त्याच्या गर्लफ्रेंडने तिथे त्याला ज्यूसमध्ये कीटकनाशक विष दिले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. कीटकनाशक विष प्राशन झाल्यामुळे त्याचे शरीरातील अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला. असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र शेरॉनच्या घरच्यांनी हा पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप केला असून कसून तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
शेरॉनच्या पोस्टमॉर्टमनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, शेरॉनचा मृत्यू एकाधिक अवयव निकामी झाल्यामुळे झाला. काही ऍसिडिक पदार्थाने त्याच्या अंतर्गत अवयवांना इजा झाली आहे. पोलिसांनी आरोपी गर्लफ्रेंडची कसून चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबुल केला आहे. मात्र तिने हे पाऊल का उचललं याचं कारण अद्याप पोलीस तपासात समजू शकलेले नाही.