जळगाव राजमुद्रा | शिंदे गटामध्ये दाखल होत असताना अनेक आमदारांना मंत्रीपदाची संधी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते त्याहून अधिक आम्ही कुठल्याच अपेक्षेने एकनाथ शिंदे सोबत जात नसल्याचे आमदारांनी देखील सांगितले होते मात्र आता सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटली तरीदेखील दुसऱ्या टप्प्यातील मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप पर्यंत झालेला नाही यामुळे अनेक आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहे.
यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांनी देखील मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा अनेक वेळा बोलून दाखवले आताही किशोर पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे इतकेच नाही तर त्यांच्या संपूर्ण मतदारसंघात भावी मंत्री आप्पासाहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असा मजकूर लिहिलेल्या बॅनर्स लागले आहे. शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदासाठी “वेट अँड वॉच” ची भूमिका घ्यावी लागली आहे. मात्र अद्याप पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ न शकल्याने अनेकजण मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहे.
यापूर्वी मुंबईमध्ये हजारो समर्थकांना घेऊन आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले होते मात्र पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर त्यांचे नाव यादीत नव्हते माध्यमांकडून त्यांना मंत्री पदाबाबत विचारणा झाली असता त्यांनी शिंदे साहेबांच्या माध्यमातून “स्वतः मुख्यमंत्री” असल्याचे सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा पाचोरा विधानसभा मतदारसंघात भावी मंत्री म्हणून किशोर पाटील यांचे बॅनर जळकत असल्याने त्यांच्या येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी वर्णी लागवी म्हणुन कार्यकर्त्यांच्या अशा पल्लवीत झाल्या असल्याचे दिसून येत आहे.
आमदार किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात, त्यामुळे तत्कालीन नगर विकास मंत्री असताना भरगोस निधी पाचोरा मतदारसंघात मिळाला होता. मात्र संधी मिळाली तर नक्की सोने करेन असे वक्तव्य करणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळते का ? याकडे आता लक्ष लागून आहे.