अमरावती राजमुद्रा | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत आमदार रवी राणा व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वादात मध्यस्थी केली. तदनंतर पत्रकारांनी फडणवीसांना गुवाहाटी बाबत प्रश्न विचारला असता माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुहाटी ला गेले होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे गुवाहाटीच नेमकं काय झालंय याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. फक्त माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीच व्यवहार नाही केला व इतर आमदारांनी व्यवहार केला का याबाबत आता राजकीय पटलावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने याबाबत चौकशीची मागणी देखील केली आहे.
गुवाहाटीत आमदार दाखल झाले ? तेव्हा नेमकं काय झालं ? या आमदारांना किती पैसे देण्यात आले ? कोणत्या आमदारांसोबत किती पैशाची डील झाली ? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहे. मात्र शिवसेनेकडून झालेल्या मागणीची चौकशी होईल का याकडे आता राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
ठाकरे गटाचे अमरावतीचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी या गुहाटीच्या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित करीत पुन्हा एकदा गुवाहाटीत गेलेल्या आमदार प्रकरणाला तोंड फुटली आहे. गेल्या अनेक दिवसापासून राजकीय तसेच माध्यमांमध्ये चर्चेत असणारे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. मात्र बच्चू कडू यांनी होके घेतले नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला आहे. बच्चू कडूंनी जर पैसे घेतले नसतील तर मग 49 आमदारांनी पैसे घेतले होते का ? याबाबत देखील स्पष्टता झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची ईडीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे.
तसेच शिवसेनेचे उपनेते सुषमा अंधारे यांनी देखील पुढील आमदारांवर निशाणा साधत भाजपच्या सांगण्यावरून हे सर्व झालं असेल, तर गेलेल्या सर्व चाळीस आमदारांना हिंदुत्व कळवलं नाही, यांचं हिंदुत्व हे देवेंद्र फडणवीस यांनी जाग केला होत असाच याचा अर्थ काढला जावा का ? असा सवाल उपस्थित केला आहे. हे बंडखोर आमदार देवेंद्र फडणवीस यांचे सारथी ठरले, बंडखोरी ही सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी होती असा तोला देखील सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.