नवी दिल्ली: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी DRDO मध्ये एक संधी चालून आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (SEPTEM) द्वारे भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. अॅडमिन आणि संलग्न संवर्गातील 1000 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर अर्ज करू शकतात.
अधिसूचना पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा :
https://www.drdo.gov.in/sites/default/files/ceptm-advertisement-documents/CEPTAM10_AA_Final03112022.pdf
अर्ज भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
https://www.drdo.gov.in/ceptm-advertisement/1920
अर्ज भरण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
- DRDO च्या सेप्टम 10 अंतर्गत A&A कॅडर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- करिअर सेक्शनमध्ये सेप्टमच्या लिंकवर क्लिक करा.
- जाहिरात विभागातील DRDO Septum 10 A&A लिंकवर क्लिक करा.
- यानंतर नवीन पृष्ठावर दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना डाउनलोड करुन नियम जाणून घ्या.
- अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल.
- नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून अर्ज सबमिट करा.
- अर्जादरम्यान 100 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे सर्व महिला उमेदवार आणि SC/ST/दिव्यांग/ माजी कर्मचारी वर्गातील उमेदवारांनी भरावे लागेल.
भरतीसाठी पात्रता :
विविध पदांसाठी घोषित केलेल्या किमान पात्रता निकषांचे तपशील अधिसूचनेत दिले आहेत, उमेदवार वर दिलेल्या लिंकवरून अधिसूचना डाउनलोड करू शकतात. तथापि, स्टेनोग्राफर ग्रेड 1 पदांसाठी उमेदवारांना स्टेनोग्राफीमध्ये पदवी तसेच इच्छित गतीची अट पूर्ण करावी लागेल. त्याचप्रमाणे, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी, इंग्रजी/हिंदीमध्ये PG आणि हिंदी/इंग्रजी विषय म्हणून पदवीचा अभ्यास केला पाहिजे.