जळगाव राजमुद्रा | बीएचआर घोटाळ्यातील संशयतांमधील प्रमुख संशयीत आरोपी, तसेच जिल्ह्याच्या बड्या नेत्यांचे निकटवर्तीय, जामिनावर असलेले उद्योजक सुनील झंवर यांच्या फार्म हाऊसला नुकतीच जिल्ह्यातील बड्या एका प्रमुख अधिकाऱ्याने भेट दिल्याची जोरदार चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सुनील झंवर हे जरी उद्योग क्षेत्रात असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर केंद्रबिंदू मानले जातात. ह्याच पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी दिग्गज नेत्यांशी त्यांचा नेहमी संपर्क येत असतो, ह्याच निमित्ताने जिल्ह्यात नुकताच दाखल झालेल्या एका बड्या अधिकाऱ्याने त्यांच्या फार्म हाऊसला भेट दिल्याची चर्चा सुरू असल्याचे समजते आहे.
उद्योजक सुनील झंवर यांचे अनेक दिग्गज नेत्यांसोबत उठणे – बसणे आहे. यामुळे उच्च-राहणीमान तसेच स्मितभाषी यामुळे अनेक अधिकारी थेट त्यांच्या संपर्कात आहे. मात्र एका बड्या अधिकाऱ्याने जिल्ह्यात दाखल होताच गेल्या आठ दिवसांपूर्वी भेट दिली आहे. या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली ? याबाबत अस्पष्टता आहे. जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक असलेला बडा अधिकारी थेट सुनील झवरांच्या संपर्कात येणे, अनेकांना अशी चर्चा ऐकिवात आल्या नंतर आश्चर्य देखील वाटत आहे.
याबाबत खुद्द सुनील झंवर यांच्याशी राजमुद्राच्या माध्यमातून संवाद साधला असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या संदर्भात तो बडा अधिकारी नेमका कोण ? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.
या प्रकरणामुळे आले चर्चेत ?
गेल्या काळात राज्यात महाविकास आघाडीची राज्यात सत्ता बीएचआर प्रकरणात सुनील झंवर राज्यभर चर्चेत आले होते. यामध्ये त्यांचा मुलगा सुरज झंवर याला देखील अटक करण्यात आली होती. मात्र काही दिवसात मुलाचा जामीन झाला होता. झंवर आणि कंडारे या दोघांना न्यायालयाने फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. जिल्हा आणि उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मात्र नाशिक येथून सापळा रचून अटक केल्या नंतर काही दिवसांत उद्योजक सुनील झंवर यांचा जामीन झाला होता.