मुंबई : भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र 2 मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. 29 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये औरंगाबाद विभागाची तर सत्र 2 मध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये नागपूर विभागाची परीक्षा होईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून परीक्षा द्यावयाची आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.
पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा होणार
सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल.