जळगाव राजमुद्रा | गेल्या अनेक दिवसापासून कायदेशीर अडचणीत आलेल्या शिवसेना नेते सुरेश दादा जैन यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे, यापूर्वी मुंबईच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती वैद्यकीय कारणावरून त्यांना जामीन झाला होता मात्र मुंबई हायकोर्ट च्या वतीने त्यांना आता नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तत्कालीन विशेष सरकारी विधी तज्ञ असलेले प्रवीण चव्हाण यांचे गिरीश महाजन यांच्या विरोधातील पेन ड्राईव्ह प्रकरणात नाव आल्याने व त्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्याकडून घरकुल घोटाळे सह अन्य न्यायालयीन कामकाज प्रकरणे काढून घेण्यात आले होते त्यांनीच केलेल्या आतापर्यंतच्या कामकाजामुळे सुरेश दादा जैन यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा देखील झाली होती.
मात्र गिरीश महाजन यांच्या फसवणूक प्रकरणात नाव आल्याने त्यांच्याकडून घरकुल घोटाळ्याचे कामकाज काढून घेण्यात आले होते.
वैद्यकीय कारणावरून सुरेश दादा जैन यांना यापूर्वी तात्पुरता स्वरूपाचा जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र आता नियमित जामीन झाल्याने सुरेश दादा जैन यांना जळगाव येथे त्याच्या निवासस्थानी देखील येता येणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून राजकारणात सक्रिय नसलेल्या सुरेश दादा जैन यांच्या जामीनाने जिल्ह्याच्या राजकारणावर नेमके काय पडसाद उमटतात ? हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या 35 वर्ष सातत्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर सुरेश दादा जैन यांचा प्रभाव होता, मंत्रिपदासह सहकार क्षेत्रामध्ये अनेक पदे त्यांनी भूषवली, यामुळे त्यांना जिल्हाभरात राजकीय प्रभाव निर्माण करता आला, मात्र घरकुल घोटाळ्यात झालेल्या कायदेशीर अडचणीमुळे त्यांना राजकारणात अधिक सक्रिय राहता आलेले नाही, या पश्चात त्यांना कारागृहात देखील राहावे लागले आहे.