जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने घरफोडीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. इस्तीयाक अली राजीक अली (वय १९, रा.तांबापुरा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत आरोपीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
रामानंदच्या हद्दीतील घरफोडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार इस्तीयाक अली राजीक अली (रा. तांबापुरा जळगाव) याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. घरफोडीत घराच्या गोदामाचा कडी-कोंडा तोडून सोन्याचे चांदीचे वापरते दागिणे, लॅपटॉप, मोबाईलची लांबवण्यात आला होता.