नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. 250 जागांपैकी 240 जागांच्या निकालात पक्षाला आतापर्यंत 131 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. तर भाजपने 99 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या आहेत. इतरांनी 3 जागा जिंकल्या आहेत. 10 जागांचे निकाल येणे बाकी आहे. 4 डिसेंबर रोजी एमसीडीच्या 250 जागांवर मतदान झाले होते. या निवडणुकीत 250 प्रभागांमध्ये एकूण 1349 उमेदवार रिंगणात होते. गेल्या 15 वर्षांपासून दिल्ली एमसीडीवर भाजपचे नियंत्रण होते. मात्र यावेळी आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिका जिंकण्यात यश आले आहे.
आम आदमी पार्टीच्या दिग्गजांच्या मतदार संघात मात्र, पक्षाला फारसे यश मिळाले नाही. मनीष सिसोदिया यांच्याकडे विधानसभेच्या 4 जागा आहेत. यात भाजपने 3 जागा जिंकल्या. फक्त एक सीट आपच्या खात्यात गेली. दुसरीकडे, तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन यांचे विधानसभेत 3 वॉर्ड आहेत. तिन्ही ठिकाणी भाजपचा पराभव झाला. अरविंद केजरीवाल यांच्या प्रभाग क्रमांक 74 चांदनी चौकातील उमेदवार पुनदीप सिंह यांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. दुसरीकडे, आपचे आमदार अनंततुल्ला यांच्या वॉर्ड क्रमांक 189 झाकीर नगरमधून काँग्रेसने विजय मिळवला आहे.
भाजप आपमध्ये रंगली चुरस
सकाळी 8 वाजता सुरुवातीचे कल येताच भाजप आणि आप यांच्यात चुरशीची लढत झाली. पहिल्या दोन तासात दोन्ही पक्षांमध्ये 10 ते 20 जागांचा फरक होता. कधी भाजप पुढे तर कधी आप पुढे. त्यानंतर सकाळी 10.30 नंतर परिस्थिती बदलली आणि ‘आप’ने भाजपवर आघाडी घेतली.
सकाळपासून आपच्या कार्यालयात जल्लोष
एक्झिट पोलमध्ये ‘आप’च्या विजयानंतर बुधवारी सकाळपासूनच पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झाला. कार्यालयाला पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवण्यात आले आहे. गेल्या वेळी ते पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवले होते. पण जसजसा निकालाची आकडेवारी समोर येऊ लागली, तसतसे उत्साह, मग निराशा आणि मग पुन्हा जल्लोषाचं वातावरण होतं. तर सकाळपासून काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट होता. कार्यालयाच्या गेटला कुलूप दिसले. भाजप कार्यालयात एकही मोठा नेता दिसला नाही. तेथे कार्यकर्ते फारच कमी होते. एक्झिट पोलमध्ये आपचा विजय दिसत असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. कदाचित हा त्याचा परिणाम असेल असे सांगितले.
यावेळी मतदान 3 टक्के कमी
दिल्ली महानगरपालिकेच्या 250 प्रभागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार यावेळी जवळपास 50 टक्के मतदान झाले आहे. 2017 मध्ये एकूण 53.55% मतदान झालं. म्हणजेच आत्तापर्यंतच्या आकडेवारीची तुलना केली तर यावेळी 3 % कमी मतदान झाले आहे.