नाशिक: : नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर विचित्र अपघात झाला. यात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. त्यामुळे दोन दुचाकीस्वारांसह आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. या प्रकारामुळे प्रवाशांनी धावपळ करत मिळेल त्या मार्गाने पेटत्या बसमधून बाहेर पडले, या घटनेत अनेकजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचे ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. आज दुपारी 12.30 वाजता ही दुर्घघटना घडली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून खाक झाली बसमधील काही प्रवाशांचा होरफळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी करण्यात आले आहे. जखमींवर बिटको हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांचीही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
बस अपघातात जखमी झालेले प्रवाशी
बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये हर्षदा मंगेस पोंदे (संगमनेर), रुपाली सचिन दिवटे (अकोले), समृद्धी सचिन दिवटे, सईदा इनामदार (संगमनेर), मुस्तफा शेख (संगमनेर), नसमा जहाँगिरदार (संगमनेर), औवेस अहमद (धारावी मुंबई), सिताराम देवराम कुरणे (सिकर) यांचा समावेश आहे.