जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पुणे विद्यापीठ मध्ये सुरु केलेला छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करणायत यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व विद्यार्थी कॉंग्रेस ने केली आहे. यासंदर्भात राष्ट्रावादीने प्रभारी कुलगुरूंना निवेदन सदर केले आहे.
पुणे विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात आला आहे त्याच प्रमाणे जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात हा डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात यावा यामुळे शिवरायांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य आणि त्यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजना तसेच युद्धनीतीतील बारकावे या सर्व विषयांवर अभासक्रम सुरु करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठात एका खासदाराने दिलेली शिष्यवृत्तीची रक्कम देखील पडून आहे. कारण त्यासाठी विद्यार्थी उपलब्ध होत नसल्याचे माहिती अधिकारात सांगितले जाते. या बाबत विद्यापीठाने तत्काळ निर्णय घेऊन अभ्यासक्रम सुरु करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर सचिव वकील कुणाल पवार, भूषण भदाणे यांनी केली आहे.