नाशिक: राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे. तर नाशिक परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. अंकुश शिंदे हे या आधी पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते.
राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर बदल्यांचे आदेश
नाशिक शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे हे नऊ महिन्यांपूर्वी बदली होऊन आले होते. आज राज्य सरकारने पुन्हा एकदा त्यांची बदली केली आली आहे. तसेच अंकुश शिंदे हे आता नाशिक शहर पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यात नाईकनवरे यांच्या बदलीचाही समावेश आहे. तर अंकुश शिंदे हे पिंपरीचिंचवडच्या पोलीस आयुक्त पदी होते. त्यांच्याकडे आता नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे.