जळगाव : शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या आंबेडकर नगरात भीषण आगीची घटना सकाळी घडली आहे. या घटनेत दोन घरांमधील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच महापालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तत्परतेनं आग विझवली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सुमारास एका पार्टेशनच्या घरामध्ये अचानक आग लागली. दरम्यान ही आग कशामुळे लागली ही माहिती अद्यापसमोर आलेले नाही. दरम्यान या आगेमुळे शेजारी असलेले पार्टिशनचे घराने देखील पेट घेतला.
दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान
यामध्ये दोघी कुटुंबातील घरातील संसारोपयोगी वस्तूंसह महत्वाची कागदपत्रे आदी सामान जाळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
यांनी केले सहकार्य
दरम्यान या घटनेबाबत पोलिसात कुठलेही नोंद करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकातील अग्नीशमन अधिक्षक शशिकांत बारी, गिरीश खडके, युसूफ अली, नंदू खडके, मोहन भाकरे, रवि बोरसे, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरीकांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.