यावल : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली होती. तालुक्यातील चिखली बुद्रुक येथील ग्रामपंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जोरदार मुसंडी मारली. प्रहार महिला जिल्हाध्यक्ष नंदिनी अनिल चौधरी व ललिता अनिल चौधरी यांनी निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार केला.
निवडणूक निकालात विजय संपादित केलेल्या प्रहारचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सायरा गणेश सोनवणे आणि सदस्या चारूलता प्रवीण फिरके, सदस्या कोमल पंडित झोपे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेचे अनिल चौधरी यांची भेट घेतली.
नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचा सम्मान
यावेळी यावल तालुकाध्यक्ष व सरपंच नंदकिशोर सोनवणे, गोकुळ कोळी, सचिन झाल्टे, राकेश भांगळे, भिका टाकारी, संग्राम कोळी व इतर उपस्थित होते. यावेळी प्रहारच्या महिला प्रमुख अँड नंदिनी चौधरी, ललिता चौधरी यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचा सम्मान करण्यात आला