जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याकडून करण्यात आले होती. यावरून आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर टीका करत स्फोटक विधान केले आहे. एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा दिला नव्हता त्यांच्याकडून तो घेण्यात आला होता असे स्फोटक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
या विषयावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, न्यायालयाकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षापासून खडसे यांचे जावई जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे आपण काय पराक्रम केले आहेत हे सर्व जनतेला व जळगाव जिल्हावासियांना माहिती असल्याचा टोला देखील मंत्री गिरीश महाजन लगावला आहे.
संजय राऊत यांना गंभीरतेंने घ्यायचे का?
दिशा सालीयन प्रकरणात एसआयटी चौकशी पूर्ण झाल्यावर सत्य काय? ते समोर येणार आहे. त्यामुळे संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय काय बोलावे अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. शिवसेना खा. संजय राऊत यांनी एसआयटीच्या माध्यमातून खोक्याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी टीका शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. यावरून आज गिरीश महाजन यांनी एसआयटी चौकशी बाबत न बोलता चौकशी पूर्ण झाल्यावर बोलणे योग्य राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे.