मुंबई: जर तुमच्याकडे अभियांत्रिकीची पदवी असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. राजस्थान रिफायनरी लिमिटेड (HRRL) ने अभियंत्यांच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार HRRL च्या अधिकृत वेबसाइट hrrl.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अभियंता पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उमेदवारांना या पदांसाठी जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी असेल.
HRRL भर्ती अंतर्गत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी या संदर्भात जारी केलेली अधिसूचना नीट वाचावी. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 142 पदांची भरती करण्यात येणार आहे. अभियंता पदासाठी भरती झालेल्या उमेदवाराला 40 हजार ते 2.40 लाख रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाईल. या बातमीत तुम्हाला अधिकृत नोटिफिकेशन लिंक आणि अर्ज करण्याची लिंक देण्यात आली आहे. येथून तुम्ही थेट भरतीसाठी अर्ज करू शकता.
थेट अर्ज कुठे करावा: www.hrrl.in
HRRL भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा
राजस्थान रिफायनरी लिमिटेड मध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होईल. यासाठीची ऑनलाइन लिंक 27 डिसेंबर रोजी अधिकृत वेबसाइटवर सक्रिय होईल. त्याच वेळी, ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2023 आहे. मुदतीनंतर उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्जाची फी किती आहे?
अभियंता पदासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जनरल, EWS आणि OBC उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील. तर, SC, ST आणि PwBD उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल, त्यातून उमेदवाराची निवड केली जाईल.