जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | समाजातील दिव्यांगांना एक दिवस विशेष लसीकरणासाठी द्यावा ज्यामुळे दिव्यांग बांधवांचे हाल होणार नाहीत त्यांना लसीकरण करता येईल त्यासाठी सामाजिक संस्था किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसने करावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षा आरोही नेवे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. सध्या कोरोन बचावासाठी लस प्रभावी ठरत असल्याने त्याचे महत्व सर्वसामान्य जनतेला देखील कळाले आहे त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवस दिव्यांगांसाठी लसीकरण आयोजित करावे. येथील आरोग्य केंदात लस उपलब्ध करून दिव्यांगांचे होत असलेले हाल थांबवण्यात यावे, कारण लसीकरण केंद्रावर दिव्यांग बांधवांना तासंतास ताटकळत बसावे लागते. त्यासाठी प्रशासनाने दिव्यांग बांधवांसाठी एक दिवस विशेष लासिकार्नाला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने केली आहे.