एरंडोल : एरंडोल शहरातील जयहिंद चौकात घराच्या बांधकामाच्या कारणावरून एकला पत्नीसह वडीलांना लोखंडी आसारीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय दगडू चौधरी (वय-४५) रा. जयहिंद चौक, एरंडोल हे आपले वडील दगडू चौधरी व पत्नी सुनिताबाई चौधरी यांच्यासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे बापू रतन चौधरी यांनी घराच्या बांधकामावरून संजय चौधरी यांच्याशी शनिवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वाद झाला. यात बापू रतन चौधरी याने संजय चौधरी यांना बांधकामाच्या खड्ड्यात लोटून दिले.
मारहाणीत चौघेघण जखमी
यावेळी भांडण आवरण्यासाठी आलेले संजयचे वडील दगडू चौधरी व पत्नी सुनिताबाई चौधरी हे आवरण्यासाठी आले होते. यावेळी बापू चौधरी याने हातातील लोखंडी आसारीने वडील व पत्नीला मारहाण केली. तसचे बापूचे नातेवाईक निर्मलाबाई रतन चौधरी, कल्पना ज्ञानेश्वर चौधरी आणि अनिता बापु चौधरी यांनी संजय चौधरी, वडील दगडू चौधरी, पत्नी सुनिता चौधरी आणि आई कमला चौधरी यांना बेदम मारहाण केली. यात चौघेजण जखमी झाले आहे.
यांच्या विरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बापू रतन चौधरी, निर्मला रतन चौधरी, कल्पनाबाई ज्ञानेश्वर चौधरी आणि अनिताबाई बापु चौधरी (सर्व रा. एरंडोल) यांच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.