जामनेर : अल्पवयीन मुलीस घरी बोलवून तिच्यासोबत अश्लिल वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथील घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. गावातील नितेश शंकर राठोड याने अल्पवयीन मुलीला त्याच्या घरी बोलावले. त्यानंतर मुलीसोबतल अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तु जर तुझ्या आईचे सोन्याचे दागिने आणले नाही तर मी गावात तुझी बदनामी करेल व माझ्या मोबाईल मधील फोटा व्हायरल करेल अशी धमकी देत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरामुळे अल्पवयीन मुलगी भेदरली असून, तीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी नितेश राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.