जामनेर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील कासली गावातील महिलेचे बंद घरातून चोरट्यांनी ४० हजारांची रोकड लांबवली. याबाबत पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील कासली येथे अनिताबाई संजय महाले या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रात्री ही महिला घरात झोपली असताना युवराज शंकर पांढरे (वय 55, रा.शेरी, ता.जामनेर) याने महिलेच्या घरात घुसून स्टीलच्या डब्यात ठेवलेले 40 हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
पहूर पोलिसात गुन्हा दाखल
हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेचे दीर अनिल गजमल महाले यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर आरोपी युवराज शंकर पांढरे (शेरी, ता.जामनेर) याच्या विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास हवालदार प्रवीण चौधरी करीत आहे.