नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत एका पुरुष प्रवाशाने महिलेवर लघवी केली. हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर एअर इंडियाने या व्यक्तीला 30 दिवस प्रवासावर बंदी घातली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुंबईचा रहिवासी आहे. त्याचे नाव शेखर मिश्रा आहे. वय सुमारे 40-45 वर्षे असून आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपी मुंबईतील मीरा रोडवर राहतो. तो भारतातील वेल्स फार्गोचा उपाध्यक्ष आहे. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी असून तिचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे.
महिलेची टाटा ग्रुपच्या अध्यक्षांकडे तक्रार
या घटनेनंतर वृद्ध महिलेने कॅबीनमधील क्रू को यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्या व्यक्तीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे यानंतर वृद्ध महिलेने टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केली, त्यानंतर विमान कंपनीचे अधिकारी सक्रिय झाले आणि त्यांनी दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर, एअर इंडियाने एक अंतर्गत समिती स्थापन केली आणि त्यांनी आरोपी प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवण्याची शिफारस केली.
महिला आयोगाचे पोलिसांना पत्र
एअर इंडियाच्या विमानात जेवणानंतर दिवे बंद असताना आरोपी व्यक्ती आपल्या जागेवर आला. त्याची पँट उघडली आणि महिलेच्या अंगावर लघवी केली. घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून बाहेर काढले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. याप्रकरणी संबंधित कायद्यान्वये तात्काळ गुन्हा नोंदवून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.