धुळे : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सव 2022-23 नुकताच स्टेडियमला पार पडला. त्यात विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये किसनराव सोनुजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल मधील सुमारे 50 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत इयत्ता 5 वीच्या 28 विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाडीवाला आया कचरा निकाल या गीतावर सांघिक नृत्य सादर केले. त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. या गीतासाठी अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. चित्रकला स्पर्धेत इयत्ता 10 वी चा विद्यार्थी आदेश धनराज जाधव याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यासाठी त्याला कलाशिक्षक डी एम बागुल यांचे मार्गदर्शन लाभले होते.
बुध्दीबळ स्पर्धेत व्दितीय क्रमांक
क्रीडा विभागात बुद्धिबळ स्पर्धेत इयत्ता 9 वी चा विद्यार्थी ओम शेळके याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला क्रीडा शिक्षक श्री.के बी.पालवे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. शाळेचे मुख्याध्यापक ऐ जी. जोग, उपमुख्याध्यापक एस पी वाघ, पर्यवेक्षक आर के पाठक व सौ. जे जे जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेलपाठक, सचिव संतोषशेठ अग्रवाल, उपाध्याक्ष डॉ महेश घुगरी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व शाबासकी दिली आहे.