यावल : तालुक्यातील मनवेल येथील एका वयोवृद्ध व्यक्तिने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहितीवरून, योगराज पांडुरंग पाटील (वय ७०) यांनी साकळी शिवारातील एकनाथ चौधरी यांच्या शेतातील विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रात्री १२.३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. आजाराच्या त्रासामुळे मानसिक संतुलन बिघडल्याच्या अवस्थेत साकळी शिवारातील एकनाथ चौधरी यांच्या शेतातील विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. मयताचे भाऊ नरेंद्र जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी करत आहे.