यावल : यावल येथील केळी उत्पादक शेतकर्याच्या शेतातील केळीची झाडे कापून सव्वा लाखांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी यावल पोलिसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील शेतकरी निर्मल नथ्थु चोपडे यांचे यावल शिवारातील शेत गट नंबर 808 आहे. यात त्यांनी केळी लागवड केली आहे व बर्या पैकी तिची वाढ झाली आहे. सद्या आठ महिन्याचे सदर केळी पिक झाले असुन त्यांच्या या शेतालगत अट्रावल गावातील बकर्या चारणारे येतात दरम्यान दोन दिवसांपुर्वी सायंकाळी अट्रावल येथील सागर मानेकर व नामदेव कोळी हे दोघे शेतातून बकर्या नेत असतांना त्यांना शेतकरी निर्मल चोपडे यांनी शेतात बकर्या चारण्यास मनाई केली होती. या दोघांनी चोपडे यांना धमकी दिली होती की, आता तु केळीचा हंगाम कसा घेतो हे पाहू.
दोघांना केली अटक
दरम्यान शुक्रवारी चोपडे यांचा सालदार मिलिंद नेमाडे हा शेतात गेला असता त्यांला केळी पिकाचे झाडे कापून फेकल्याचे निर्दशनास आले व त्यांनी शेतकरी निर्मल चोपडे यांना माहिती दिली. शेतकर्याने शेतात जावून पाहिले असता सुमारे दीडशे केळीचे झाडे कापून टाकल्याचे दिसून आले. ही झाडे धमकी दिल्यानुसार सागर मानेकर व नामदेव कोळी (अट्रावल) यांनी कापल्याचा संशय व्यक्त करीत यावल पोलिस दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.