मुंबई : राज्यात शिवसगेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील आठ पैकी एका मुद्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश वाय.एस.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठ यासंदर्भात निर्णय देणार आहे. ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर हा निर्णय होणार आहे.
शिवसेना कुणाची? या एका प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सत्तानाट्य आता निर्णयाक टप्प्यावर पोहोचले आहे. आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं हे पाहण्याचं ठरणार आहे.
काय आहे शिवसेनेची मागणी
सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती.
आज होणार निर्णय
या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातलं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे गेलं तर त्याचा परिणाम ही केस लांबण्यातही होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते.