जळगाव : जळगाव महापालिकेच्या आयुक्त पदावरून सुरू असलेला तिढा काही सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. आयुक्त विद्या चव्हाण ह्या मॅटमध्ये गेल्याने सध्या मॅटच्या न्यायालयामध्ये आयुक्त पदाचा कायदेशीर वाद सुरू आहे. त्यामुळे आयुक्त पदाची सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून जळगाव महापालिकेत आयुक्त पदाच्या खुर्चीवरून राजकीय हस्तक्षेप वाढल्याने वाद सुरू आहे. महापालिकेत सध्या दोन आयुक्त आहेत. यामध्ये देविदास पवार व विद्या गायकवाड यांच्याकडे कायदेशीर कारभार आहे. मात्र दोघांनाही प्रशासकीय कारभार चालवण्याचे कुठलेही अधिकार नाहीत.
शहर विकासावर परिणाम
या सर्व घडामोडींमुळे शहर विकासावर परिणाम होत आहे. आयुक्त विद्या गायकवाड या सध्या जळगाव ठाण मांडून आहेत. तर देविदास पवार देखील महापालिकेच्या आयुक्त पदावर कायम आहेत. मात्र महापालिकामध्ये चाललेल्या सुरळीच्या काळात दोघेही सध्या तरी जळगाव महापालिकेच्या आयुक्त पदावर कायम आहेत.
महत्वाचे विषय रेंगाळले
शहराच्या महत्वपूर्ण निर्णयावर देविदास पवार यांना धोरणात्मक प्रकरणांवर स्वाक्षरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे आयुक्त असून देखील शहरातील महत्त्वपूर्ण विषय रेंगाळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.