चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. भागात असलेले स्वयंवर मंगल कार्यालयाच्या समोर असणारे स्टेट बँकेचे थेट एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेले. मंगळवारी रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
एटीएम हे अत्यंत गजबजेल्या भागात आहे. त्यात चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडून मशीन लांबविले आहे. त्यामुळे चोरट्यांची मजल इथवर पोहोचली असल्याने लोकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभा राहतो. दरम्यान मंगळवारी दुपारी या एटीएममध्ये १७ लाखाची रोकड भरल्याची माहिती मिळाली आहे.
रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला चोरीची घटना लक्षात आली. त्यांनी गाळेधारकाला उठवून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनाही ही घटना कळवली. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे.