जळगाव : श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित शिंपी समाज युवक मंडळातर्फे शेठ फत्रू लक्ष्मण शिंपी समाज वसतीगृह या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांच्या व राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन युवक शहर अध्यक्ष जितेंद्र शिंपी अखिल भारतीय युवक कार्याध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्था अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे व अमृत महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष विवेक जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य कार्यक्रमाप्रसंगी
अ.भा.माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, अ.भा.कार्यकारणी सदस्य चेतन खैरनार, शहर युवक संघटक अमित जगताप, युवा कार्याध्यक्ष एडवोकेट भूषण सोनवणे, जिग्नेश सोनवणे, हेमंत शिंपी, विशाल देवरे , सुमित अहिरराव, सागर शिंपी , ऋषिकेश शिंपी, निलेश चव्हाण , निखिल सोनवणे , राकेश बाविस्कर , राजेश सोनवणे, अशोक सोनवणे , कमलेश शिंपी , तसेच मुकुंदराव मेटकर, अनिल सोनवणे, सुरेश दादा सोनवणे ,दिलीप सोनवणे, गणेश सोनवणे , सोमनाथ बाविस्कर, दत्तात्रय वारुळे, राजेंद्र वारुळे, नथू शिंपी, इत्यादीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
15 व्यक्तींनी रक्तदान केले
या कार्यक्रमासाठी रेड क्रॉस सोसायटी जळगाव चे विशेष सहकार्य लाभले यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ शंकरलाल सोनवणे सीमा शिंदे, निता पाटील, उमाकांत शिंपी आणि अन्वर खान यांनी सहकार्य केले. यावेळी एकूण 15 व्यक्तींनी रक्तदान केले.