जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मोहाडी रोड वरील प्रभाग क्रमांक १३ येथे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जन्मात प्रतिष्ठान ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेतर्फे विनामूल्य कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी नगरसेविका नीता सोनावणे, विवेक सोनावणे हेही उपस्थित होते. जळगाव शहराला कोरोनामुक्त करूया व आपण सर्वांनी मिळून शहराला सुंदर व निरोगी ठेऊया असेही जयश्री महाजन यावेली म्हणाल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे साहिल पटेल, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे योगेश सपकाळे, दिनेश तेजी यांचे सहकार्य लाभले, पोलीस सेवा संघटनेचे भावेश ठाकूर, महेश पाटील, तीलोत्तमदास बोंडे, हर्षाली पाटील, किरण कोलते, नितीन सपके, विनय नेहेते, मोतीलाल परडी, हितेश भावसार, हेमंत वैद्य, दिपाली पाटील, शोभा अशोक पाटील, विश्र्वेश खंडेलवाल, विजय सोनवणे, आर,सी,पाटील यांची उपस्थिती लाभली, कार्यक्रमाचे नियोजन पंकज नाले, महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, प्रभागातील बहुसंख्य लोकांची या कार्यक्रमास उपस्थिती दिली.व प्रभागातील नागरिकांनी टेस्ट करून घेतली, शहरात प्रत्येक प्रभाग मध्ये शिबिर घेऊन शहर कोरोना मुक्त करण्याचे जनमत प्रतिष्ठान चे अभियान आहे.