नवी दिल्ली : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय डाक विभागाने पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी एकूण 98,083 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. डाक विभागाने आपल्या अधिकृत वेबसाईट indiapost.gov.in वर ही रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे.
डाक विभागाने दिलेल्या जाहिरातीनुसार
एकूण 98083 रिक्त पदांपैकी पोस्टमनच्या 59099 जागा आणि मेल गार्डच्या 1445 जागा रिक्त आहेत. तर मल्टी-टास्किंग पदासाठी 23 मंडळांमध्ये एकूण 37539 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
आवश्यक पात्रता
पोस्टाने जाहीर केलेल्या पदांसाठी इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण किंवा त्याहून अधिक वर्ग उत्तीर्ण आवश्यक आहे. ते इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, उमेदवार पात्रता निकषांसंदर्भात इतर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासून पाहू शकतील.
अर्ज कुठे करायचा?
इंडिया पोस्ट ऑफिस लवकरच या भरतीसाठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात तारीख आणि शेवटची तारीख याबद्दल अधिसूचना जारी करणार आहे. या भरतीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो.
आवश्यक वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 32 वर्षे ठेवण्यात आली आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
– या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट दिली पाहिजे.
– आता तुम्हाला होमपेजवर ‘India Post Recruitment 2023’ ची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
– यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, येथे ‘Register Now’ वर क्लिक करा.
– आता तुमच्या समोर एक नवीन टॅब उघडेल. येथे तुम्हाला स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
– रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
– सविस्तर माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल.
– फी भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट देखील घ्या.